‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू सासऱ्याला अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथील विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय २९) या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्या.

त्यांना वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पती गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड, सासरा बाळासाहेब कारभारी गावंड, सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत महिलेचे पिता विलास लक्ष्मण शिंदे (जवळके) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी या तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली.

जयश्री विलास शिंदे यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी मंजूर वडाचीवाडी येथील गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड या तरुणाबरोबर थाटामाटात लावून दिला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवरा, सासू, सासरे यांनी किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर एकदा स्वरूपाची मारहाण झाल्यावर महिलेच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अदखल प्राप्त गुन्हा दाखल केला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24