श्रीरामपूरमध्ये कोरोनाने घेतला ‘त्या’ समाजसेवकाचा बळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

काल श्रीरामपूर शहरातील एका समाजसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मृतांचा आकडा 22 इतका झाला आहे.

तालुक्यात नुकतीच ३ डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. काल तालुक्यात पुन्हा नव्याने 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 789 इतकी झाली आहे.

काल आढळून आलेल्या 15 रुग्णांमध्ये वॉर्ड नं. एक- 5, वॉर्ड नं. तीन-3, वॉर्ड नं. सात-2, शिरसगाव- 3,अशोकनगर फाटा 1, भोकर -1 रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, ही वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. सर्वांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, सोशल डिस्टंस तसेच मास्क आदींचा अवलंब करावा आणि गरज असेल त

रच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या १७ हजार ८७६ आहे.

३ हजार ३०४ रुग्ण सध्या उपचार घेत असून २९२ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात एकूण रूग्ण संख्या २१ हजार ४७२ इतकी आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24