अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूड हादरून गेलं. त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. तो डिप्रेशनमध्ये असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
मुंबई पोलिसांनी मानोसोपचार तज्ज्ञ केसरी चावडा यांचे स्टेटमेंट घेतले आहे. त्यांनी खुलासा केला की सुशांत त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला खूप मिस करत होता आणि त्याला ब्रेकअपचा खूप पश्चाताप झाला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत मागील सहा महिन्यात तीनदा डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टरांनी सांगितले की, सुशांत गेल्या एक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होता. रात्री त्याला झोप येत नव्हती.
त्याच्या मनात विचित्र विचार येत होते. अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्याच्या काही कालावधीनंतर काही काळ सर्वकाही सुरळीत चालू होते.
मात्र काही अयशस्वी रिलेशनशीपमुळे त्याला जाणीव झाली की त्याला कुणीच पसंत करत नव्हते. डॉक्टरांनी कृती सेनॉन आणि एका दिग्दर्शकाच्या मुलीचाही उल्लेख केला आहे, ज्यांच्यासोबत सुशांत रिलेशनशीपमध्ये होता. दोन्ही नाते अयशस्वी ठरले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews