ब्रेकिंग

अखेर जे व्हायचे तेच झाले! नगर जिल्ह्यात ‘लालपरी’वर दगडफेक ; चालक किरकोळ जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-   काल एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते.

त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली. मात्र आज पैठण, अहमदनगर व श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली.

या प्रकारामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. दरम्यान काल राज्य सरकारने एसटी मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसला पोलिस बंदोबस्त देण्याचे सांगितले होते.

त्यानुसार शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला पण शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही.

दरम्यान शेवगावहुन नगरकडे जाणाऱ्या गाडीवर अज्ञात इसमाने शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे दगड मारल्याने पाठीमागची काच फुटली आहे.

तर श्रीरामपुरकडे जाणाऱ्या बसवर नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे व शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक केली आहे.

यामध्ये चालक नामदेव खंडागळे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आता एसटी सुरु झाल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण होते, मात्र या प्रकारामुळे सर्वजण धास्तावले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office