कोरोनाच्या संकटकाळात ‘ह्या’ आजारांविषयी दिलासादायक माहिती समोर; डॉक्टर म्हणतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- सध्या कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर कोरोनाने चांगलाच विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.

परंतु इतर डेंग्यू , मलेरिया आदी आजारांबाबत काही दिलासादायक गोष्टी समोर आल्या असून डॉ.रजनी खुणे यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार नगर जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णात घट झाली असून मलेरियाही नियंत्रणात आला आहे. मागील वर्षी जानेवारी ते जून २०१९ अखेर डेंग्यूचे २८ रुग्ण होते.

यंदा फक्त ७ रुग्ण आहेत. त्यात जवळपास २१ रुग्णांची घट आहे. मागील वर्षी ११८ रक्त नमुने गोळा केले होते. यंदा ६० रक्त नमुने गोळा केले. त्यात ७ दूषित रुग्ण आढळून आले आहेत.

तर मलेरियाचे मागील वर्षी ३ लाख ७ हजार ५९७ रक्त नुमने घेतले होते. त्यात फक्त २ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी २ लाख ६४ हजार ३०० रक्त नमुने गोळा केले होते.

त्यात २ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.ग्यू, मलेरिया हे दोन्ही आजार गंभीर आहेत. हे दोन्ही कीटकजन्य आहेत. कीटकांपासून ते होतात. यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

यासाठी नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. व्हेंटपाईलपला जाळी बांधावी. घराच्या बाजूच्या पाणी साचणा-या वस्तूचा नायनाट करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24