अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनेचे धडाडीचे वक्ते आणि टोलेजंग नेत्यांची खाण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे विजय औटी हे एक मुरब्बी राजकारणी आहेत.
ते कधीही शांत बसणार नाहीत. राजकीय मैदानात वादळ बनून पुन्हा ते यशस्वी होतील,” असा आत्मविश्वास नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी व्यक्त केला.
नारायगव्हाण येथे शुक्रवारी (ता. 13) एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. बोरुडे म्हणाले, माजी आमदार औटी तालुक्याच्या राजकरणात नेहेमीच सक्रिय असतात.
अनेक प्रश्न त्यांनी आजवर मार्गी लावलेले आहे. तसेच औटी हे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. पारनेर तालुक्यातील तरुण मुले दिशाहीन झाली असून, त्यांना ते नक्कीच योग्य दिशा देतील.
औटींच्या नेतृत्वाखाली आगामी पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व जागा शिवसेना जिंकेल. तालुक्यात पुन्हा शिवसेनेची ताकद निश्चितच वाढेल.
राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याचा प्रस्ताव तालुक्यातील गावपुढाऱ्यांसमोर मांडला असला, तरी ते शक्य होणार नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved