त्या दोघांच्या भांडणात अहमदनगर शहरातील हा चौक झाला साफ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ हि म्हण तुम्ही ऐकली असेल, मात्र इथे जरा वेगळंच घडलं आहे. त्या दोघांच्या भांडणाची झळ इतरांना बसली आहे.

एका दुकानदाराचे आणि एका भाजी विक्रेत्याचे भांडण झाले. या वादातून महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने प्रोफेसर चौकातील सर्वच भाजीविक्रेत्यांना हटवले आहे.

प्रोफेसर चौकात अनेक दिवसांपासून भाजी विक्रेते बसतात. रस्त्याच्या कडेने दिलेल्या जागेवर ते भाजी विक्री करतात. यापूर्वी भाजी विक्रेत्यांना या परिसरातून हटविण्यात आले होते.

मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे या भाजी विक्रेत्यांना पुन्हा चौकात बसण्याची परवानगी मिळाली. मात्र एका भाजी विक्रेत्याचे व दुकान मालकाचे झालेल्या भांडणात

मनपा व पोलीस प्रशासनाने चौकातील सर्व भाजीपाले वाल्याना तातडीने चौकातून हटविले. लॉकडाऊनमुळे आधीच धंद्यावर परिणाम झाला आहे.

त्यात महापालिका प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला, असे विक्रेते सांगत आहेत. महापौर, आयुक्तांची भेट घेऊन आम्ही आमची समस्या सांगणार आहोत अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24