या बाजार समितीमध्ये विना आडत भुसार लिलाव सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून भुसार (धान्य) शेतमालाचा विना आडत, खुल्या पध्दतीने जाहीर लिलाव सुरू करण्यात येणार आहे.

लिलावात विक्री झालेल्या शेतमालाचे पेमेंट रोख, आरटीजीएस, चेकद्वारे तत्काळ शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची माहिती सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली. खेमनर म्हणाले, शेतमालाचे योग्य व अचुक मोजमाप होणार आहे.

कोणताही छुपा खर्च नाही. खुल्या लिलाव पध्दतीमुळे शेतमालाचे मोल होणार आहे. आडत बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. शेतकऱ्यांना फक्त हमाली व मापाईसाठी पैसे द्यावे लागणार आहे.

शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रथम लूज शेतमालाची आवक संगमनेर बाजार समितीत सुरू केली आहे. यातून जवळपास प्रति क्विंटल १०० रुपयांप्रमाणे रिकामे पोते व पोते भरणे खर्च वाचणार आहे.

५ किमी. अंतरापर्यंत व्यापाऱ्यांच्या खळ्यावर वाहनात शेतमाल विनामूल्य नेण्याची जबाबदारी शेतकरी व वाहनचालकावर राहणार असल्याचे खेमनर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24