या राज्यात बलात्कार प्रकरणाचा अवघ्या २१ दिवसांत होणार निपटारा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
वृत्तसंस्था :-  हैदराबादेतील एका पशुवैद्यक तरुणीची नुकतीच सामूहिक बलात्कारानंतर निघृर्ण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते.
या पार्श्वभूमीवर आंध्र विधानसभेने शुक्रवारी ‘आंध्र प्रदेश दिशा अधिनियम फौजदारी कायदा (आंध्र प्रदेश सुधारित) अधिनियम-२०१९’वर आपली मोहोर उमटवली. या विधेयकाद्वारे मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
महिला व मुलांवरील अत्याचार विशेषत: लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची वेगवान सुनावणी करून आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद असणाऱ्या एका महत्त्वपूर्ण विधेयकावर आंध्र प्रदेश विधानसभेने शुक्रवारी आपली मोहोर उमटवली.
या कायद्यांतर्गत अशा खटल्यांचा अवघ्या २१ दिवसांत निपटारा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य कायदेमंडळाने ‘भादंवि’ व ‘सीआरपीसी’त योग्य ती सुधारणा केली आहे.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24