अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत.
काल आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत १३६ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यातील ९० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
शहरातील परवा सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 101 व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये 18 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
या १८ रुग्णांमध्ये टिळेकर वस्ती येथील 60 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, संजीवनी येथील 18 व 27 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 88 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष,
बैल बाजार रोड येथील 66 व 36 वर्षीय पुरुष तर 46 व 27 वर्षीय महिला, सुभाष नगर येथील 18 वर्षीय पुरुष, महादेवनगर येथील 63 वर्षीय पुरुष, शंकर नगर येथील 38 वर्षीय पुरुष,
टिळकनगर येथील 50 वर्षीय महिला, तर तालुक्यातील धारणगाव येथील 45 वर्षीय पुरुष तर मंजूर येथील 13 वर्षीय मुलगा तर 32 व 30 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com