उत्तर प्रदेशात लोकशाही नसून जंगलराज : कदम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशात पोलिस प्रशासनाच्या मदतीने दबावाचे राजकारण करुन गुंडांना मोकळे रान करुन देत आहे.

योगी सरकार बरखास्त करुन पिडितेच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी पुढाकार घेईल. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही नसून जंगलराज सुरू आहे, असा आरोप माजी महापौर सुरेखा कदम यांनी केला.

उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट कँडल मार्च काढण्यात आला होता.

यामध्ये माजी महापौर सुरेखा कदम, महिला जिल्हा प्रमुख आशा निंबाळकर, शहर प्रमुख अरुणा गोयल, सुजाता कदम, हेमा खैरे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम,

ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, संजय शेडगे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सूरज शेळके, रमेश परतानी, संतोष शिंदे आदी सहभागी झाले होते.

हा कॅन्डल मार्च दिल्लीगेट येथे आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकाराचा निषेध करण्यात येऊन मुख्यमंत्री योगी व तेथील पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या

.यावेळी अाशा निंबाळकर, अरुणा गोयल, अंबादास पंधाडे आदिंनी आपल्या भावना व्यक्त करुन हतरस येथील घटनेचा निषेध करुन योगी सरकारवर टीका केली व पिडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24