अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने चक्क स्वताच्याच बापाचा खून केल्याची घटना संगमनेर मध्ये घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळ वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह दि २७ जानेवारी बुधवारी सकाळी आढळून आला होता .
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल मदने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली आणि रुग्णवाहीनीतून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील एका रुग्णालयात पाठविले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित तरुणाला अटक केली होती .
मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या नाव सिताराम भीमा काळे आहे तर दुसरा तरुण त्याच्या मित्र आहे. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा दोघी तरूण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्या चौकशीत पोलिसांना अडथळा येत होते .
मात्र पोलीस निरीक्षक पाटील यांना सिताराम भीमा काळे याच्यावर जास्त संशय असल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले मात्र नंतर चौकशी कसून केल्याने त्यांनी धक्कादायक कबुली दिली आहे.
त्यांनी पोलिसांना सांगितले की मयत व्यक्ती भीमा सोमा काळे हा माझा बाप आहे आणि मी त्याची हत्या केली आहे अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र त्यांनी ही हत्या का केली याच्या कारण अद्याप समजू शकलेला नाही.याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.