अहमदनगर जिल्ह्यातील घटना : मुलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महिलेचेही आज निधन झाले असुन या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बेलापूरातील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट झाला या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले बेलापुर परिसर या आवाजाने दणाणून गेला.

या वेळी लागलेल्या आगीत शशिकांत शेलार ,ज्योती शशिकांत शेलार , यश शशिकांत शेलार, नमश्री शशिकांत शेलार हे चौघेही गंभीर जखमी झाले होते.

Advertisement

त्यांना प्रथम साखर कामगार हॉस्पिटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते तेथे उपचार सुरु असताना मुलगी नमश्री हीचे चार दिवसापूर्वीच निधन झाले होते.

यश यास दवाखान्यातुन घरी सोडण्यात आले होते. शशिकांत व त्याची पत्नी ज्योती हीच्यावर उपचार सुरुच होते या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पत्रकार देविदास देसाई यांनी पन्नास हजार रुपयापर्यत आर्थिक मदत मिळवुन दिली होती.

आज या दुर्घटनेतील ज्योती शशिकांत शेलार यांचेही उपचार सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांचेवर बेलापुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement