अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-गेल्या महिन्याभरापासून शहर आणि परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहे. या घटना केवळ शहरापुरत्याच मर्यादित न राहता चोरीच्या घटनांचा सिलसिला जिल्हाभरात सुरूच आहे.
दरम्यान शहर व उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. दररोज तीन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून दोन तर तालुका पोलीस ठाणे हद्दीतून एक अशा तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वडगाव गुप्ता येथील जालिंदर बाळासाहेब मोरे यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोरून पहाटेच्या सुमारास चोरीला गेली.
याप्रकरणी मोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये राहत असलेले निरज प्रविण हरेश यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोरून रात्रीच्यावेळी चोरीला गेली.
हरेश यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील
जखणगाव येथील मनोहर तबाजी काळे यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून भरदुपारी एकच्या सुमारास चोरीला गेली. काळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पोलिस ठाण्यात फक्त त्यांची नोंद होत असून तपासात काहीच प्रगती होत नसल्यामुळे पोलिस नेमके करतात तरी काय? अशी विचारणा सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved