अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यात आरोग्याच्या सोयी-सुविधांचा अभाव, तसेच अधिकारी व पुढाऱ्यांच्या निव्वळ चमकोगिरीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. बाधितांची संख्या रविवारी १६४० झाली.
उपचार घेऊन १३७० रुग्ण घरी परतले आहेत. २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या अडीच महिन्यात ४० रुग्णांचा मृत्यू झाला. लाॅकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर प्रशासनाकडून मोकळीक दिली गेल्याने महामारी खऱ्या अर्थाने सुरू झाली.
फिजिकल डिस्टन्सिंगचे आदेश पायदळी तुडवले गेले. गुरूवारी भरणारा आठवडा बाजार बंद करून सहा दिवस बाजार भरवण्यासाठी प्रशासनाकडून मोकळीक दिली गेली.
सोयी-सुविधा उपलब्ध करणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेले. कृषी विद्यापीठातील शेतकरी निवास, विद्यार्थी वसतिगृह ताब्यात घेऊन कोविड सेंटर, रॅपिड अँटिजन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले.
मात्र, सोयी-सुविधा, तसेच रॅपिड अँटिजन तपासणी किटचा तुटवडा भासल्याने रुग्णांची संख्या वाढतच गेली. तपासणी केंद्रावर रॅपिड अँटिजन किटचा तुटवडा असल्याने तीन आठवडे रुग्णांची हेळसांड झाली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved