अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात एका विवाहित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, बोठे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्याता आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती.
या घटनेचा मुख्यसुत्रधार बाळ बोठे असून तो 25 दिवसापासून फरार आहे. पोलीस प्रशासनाकडून बोठे याचा शोध सुरु आहे. खूनासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बोठे याच्या अडचणीत भर पडली आहे.
बोठे याने दि. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान संबंधित महिलेच्या घरी येवून तिचे पतीस कामानिमित्त बाहेर पाठवून महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे.
तसेच बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तेव्हा पासून बोठे याचा शोध पोलीस घेत आहेत .