फरार बाळाच्या अडचणीत वाढ; मालमत्ता जप्तीसाठी हालचाली सुरु!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाने नगर जिल्हा चांगलाच हादरला आहे. यातच या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे गेल्या काही दिवसांपासून फरार आहे.

बोठे याचा शोध अद्यापही न लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान जरे हत्याकांडातील सूत्रधार बाळ बोठेच्या अटकेसाठी पोलीस आता कायद्याचा आधार घेण्याची तयारी करत आहेत.

त्याला फरारी घोषित झाल्यानंतर त्याच्या मालमत्तेची जप्ती केली जाणार आहे. तशी प्रक्रिया पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

30 नोव्हेंबला यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

त्यानंतरच्या तपासात बाळ बोठे यानेच जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे उघडकीस आले. तेव्हापासून बोठे हा नगरमधून पसार झाला आहे. 21 दिवस उलटले तरी तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

फरारी घोषित केल्यानंतर पोलीस त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, नगरच्या न्यायालयात त्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तोही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24