अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- जिल्हा प्रशासनाने नुकतीच लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे.
मात्र असे असले तरी नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजाराने स्वतःची स्वतंत्र कोरोना नियमावली केली आहे व त्यानुसार सकाळी ५ तास व दुपारी २ तास किराणा दुकाने उघडी ठेवली जाणार आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या गावपातळीवरील उपाययोजनांतर्गत हिवरे बाजार गावाने आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी म्हणून ही आपल्यापुरती नियमावली केली आहे.
हिवरे बाजार गावाची नियमावली
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना ग्रामसुरक्षा समितीने पुढीलप्रमाणे नियमावली तयार केली आहे. गावातील किराणा दुकान वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ व संध्याकाळी ३ ते ५ या वेळेव्यतिरिक्त दुकान चालू ठेवू नये
व ग्रामस्थांनी दुकानात जाऊ नये. दुकानात सामाजिक अंतर ठेवावे. गावातील हेअर कटिंग सलून दुकान ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णतः बंद राहील. ग्राहकांनी दुकानदाराशी संपर्क करू नये.
गावातील मालवाहतूकदार वाहनचालक व प्रवासी वाहने चालक यांनी स्वत:ची कोरोना तपासणी करून घ्यावी. त्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क करावा.
दूध डेअरीवर सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ७ ते ८ या वेळेतच दूध संकलन करावे. तसेच दूध संकलन करताना सामाजिक अंतर ठेवावे. प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved