भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बंगळुरु : रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं.

सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रोहितनं शतक झळकावलं. तर कर्णधार विराट कोहलीचं मात्र शतक हुकलं. विराट आणि रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची निर्णायक भागीदारी साकारली. रोहितनं 119 तर विराटनं 89 धावांची खेळी केली.

पहिल्या विकेटसाठी दोघांनी ६९ रनची पार्टनरशिप केली. केएल राहुल १३ व्या ओव्हरमध्ये १९ रनवर आऊट झाला. रोहित शर्माने पुन्हा एकदा धमाकेदार खेळी करत ११९ रन केले आणि भारतीय संघाचा विजय खेचून आणला.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथने १३१ रन केले. मार्नस लाबुशेनने ५४ तर एलेक्स कॅरीने ३५ रन केले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट घेतले. रवींद्र जडेजाने २, नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

चौथ्या ओव्हरमध्येच शमीने डेविड वॉर्नरची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. डेविड वॉर्नर 3 रनवर आऊट झाला. एरॉन फिंच १९ रनवर रनआऊट झाला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24