इंदोरीकर महाराज म्हणाले कधी नव्हे इतका आता त्रास होतोय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सव्वीस वर्षांत झाला नाही इतका त्रास अलीकडच्या काळात होतोय. ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला जात असून, माझ्या वक्तव्यावर काही आक्षेप असेल, तर जागेवर बोला.

जेवढा त्रास मला माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत झाला नाही, तेवढा त्रास मला आता होत आहे, अशी खंत कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी मंगळवारी आडगाव येथील एका कार्यक्रमात व्यक्त केली.

येथील आडगावात शिवजयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १८) आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात इंदोरीकर महाराज बोलत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24