अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचं दिसलं होतं.
या वाक्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांना नोटीस देण्यात आली होती. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बुधवारी त्यांच्या वकिलांनी जिल्हा रुग्णालयात येऊन खुलासा सादर केला. याबाबत बोलण्यास मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि वकिलांनी नकार दिला होता.
यात इंदोरीकर महाराजांनी मी असं वाक्य बोललोच नाही आणि मी असं कीर्तन केलंच नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आता यावर जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इंदोरीकर महाराज यांनी नोटीसला उत्तर देताना म्हटलं, “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही.
मी समाज प्रबोधन करत असल्याने मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही.”
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com