इंदुरीकर महाराज कीर्तन नाही सोडणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी तब्बल १७ ग्रंथाच्या आधारे ‘ते’ विधान केले आहे. अजूनही मी माझ्या विधानावर ठाम असून सोशल मीडियासह माध्यमांनी उठवलेल्या टीकेच्या झोडीमुळे काही काळ अस्वस्थ झालो. कीर्तन सोडून शेती करावी असा विचार आला होता.

उद्विग्नता आली मात्र लोकांच्या चुका शोधणाऱ्या मीडियाला न जुमानता हाती घेतलेला समाज प्रबोधनाचा वसा कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, असा निर्धार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी उंडेगाव (ता.गंगाखेड) येथे व्यक्त केला.

पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते काही ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. मात्र जो काही वाद झाला त्यामुळे मला खूप त्रास झाला, मी उद्विग्न झालो आहे. दोन दिवसात माझं वजनही कमी झालं आहे. आता एक-दोन दिवस वाट पाहिन. वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली होती.

मागील तीन दिवसांपासून इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याने राज्यभरात चर्चेला मोठे उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उंडेगाव येथे महाशिवरात्री-निमित्त आयोजित सप्ताहात चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी(दि.१४) रात्री त्यांच्या कीर्तनाविषयी मोठी उत्सुकता असल्याने तोबा गर्दी झाली होती.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24