इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान इंदुरीकर यांनी एका ४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले होते.

या संदर्भात एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दाखल घेत अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. पुरावे कोणी सादर केल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24