संतापजनक : सिव्हिलमधील मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- सिव्हिलमध्ये उपचार घेत असताना मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तोफखाना पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे.

भिंगारजवळील वडारवाडी येथील एकाने याप्रकरणी तोफखाना पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांचे नातलग सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्ड १ मध्ये १५ क्रमांकाच्या बेडवर उपचार घेत होते.

त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कोणीतरी काढून घेतले, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी या तक्रारीनुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन

१८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते रात्री ९ या काळातील आयसीयू वॉर्ड १ चे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे. या फुटेजच्या आधाराने या दिवशी वॉर्ड क्रमांक १ मध्ये नेमके काय घडले,

तसेच मृत व्यक्तीच्या अंगावरील दागिने कोणी काढून घेतले, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, सिव्हिलमधील अन्य चोऱ्यांवर त्यामुळे प्रकाशझोत पडेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24