अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अकोले तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायत शिपाई रामदास लखा बांडे यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी आ. लहामटे यांचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावरून तेथील राजकारण तापले आहे. परंतु हा प्रकार म्हणजे सूडबुद्धीचा आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे.
असे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी यांनी दिला.
या गुन्ह्याच्या निषेधार्थ काल सोमवारी अकोले शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी नाईकवाडी बोलत होते.
आ. डॉ. लहामटे याच्या सूचनेनुसार आजचा निषेध मोर्चा स्थगित करण्यात आला आहे, अशा सूचनांच्या पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध ग्रुपवर दिल्या होत्या.
मात्र तरीही काही अतिउत्साही पक्ष कार्यकर्त्यांनी ही सूचना न पाळता पक्ष कार्यालयापासून शहराच्या प्रमुख रस्त्यावरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
राष्ट्रवादी अंतर्गत या प्रश्नी व नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीपासून अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आमदार लहामटे यांच्या कार्यपद्धती वरही काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved