अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : येथील न्यायालयातील विधिज्ञांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी सोमवारी आमदार आशुतोष काळे यांनी न्यालयालयाला भेट दिली.
शहराच्या मध्यवर्ती असलेली कोपरगाव न्यायालयाची इमारत अनेक वर्षांपूर्वी बांधलेली असल्याने सध्या मोडकळीला आलेली आहे. इमारतीचा काही भाग नुकताच कोसळला होता.
त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी वकील संघाने सरकार दरबारी पाठपुरावा केलेला असून काही तांत्रिक अडचणी आल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर होऊनही काम मार्गी न लागल्याने वकील संघाने आमदार काळे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.
न्यायालय परिसरास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वाघचौरे, भावसार यांच्यासह आ. काळेंनी भेट दिली व विधिज्ञांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.