ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात शिवरायांच्या बॅनरचा अवमान, गुन्हा दाखल !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले होडिंग काढताना छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे छायाचित्र असलेल्या बॅनरचा अवमान करणाऱ्या महापालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई होण्यासाठी

शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. १३ ऑक्टोबर) तोफखाना पोलीस स्टेशनला ठाण मांडले होते. तर शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून महापालिकेच्या कर्मचारीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्याशी सदर प्रकरणी चर्चा करुन भावना दुखावल्या म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे,

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, बजरंग दलाचे कुणाल भंडारी, बंटी ढापसे, योगेश गलांडे, आकाश कातोर, महेश लोंढे, अनिकेत कराळे, काका शेळके, आनंद शेळके, अनिल ढवण आदी उपस्थित होते.

गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) संध्याकाळी प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले सभेचे होडिंग मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने काढण्यात आले. त्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे फोटो व मजकूरचा समावेश होता.

सदर फलक काढताना कर्मचाऱ्यांनी महाराजांचे राज्याभिषेकाच्या फोटोचा अवमान केला त्याचे व्हिडिओ देखील युवकांनी काढले त्या व्हिडिओद्वारे तोफखाना पोलीस स्टेशन येथे महापालिकेचे कर्मचारीरी सागर जपकर यांच्यावर कुणाल भंडार यांच्या फिर्यादीवरून शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office