कांदा उत्पादकांना उद्ध्वस्त करण्याचा डाव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- कोरोना काळात कांदा उत्पादक अडचणीत सापडला असताना कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांना संकटात आणले.

त्यात आता आयकर विभागाच्या धाडी टाकून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव माेदी सरकारने चालवला आहे, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केला.

भुजबळ यांचा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आज जनता दरबार पार पडला. त्यात ते बोलत होते. ते म्हणाले, कांदा प्रश्नाबाबत केंद्रसरकारने जो निर्णय घेतला आहे तो शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत आहे.

शेतकरी अडचणीत असताना धाडी टाकायच्या आणि त्यांच्यावर दबाव टाकायचा हे काम मोदी सरकारने चालवले असल्याचा अाराेप त्यांनी यावेळी केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24