अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांचा पुणे महामार्गावर सुपा जवळील जातेगाव घाटात निर्दयीपणे खून करण्यात आले. या हत्याकांडात पत्रकार बाळ बोठे मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे.
सध्या तो फरार असून, त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, बाळ बोठे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आला आहे. बातमीदार ते मुख्य संपादक पदाचे काम पाहत असताना त्याने कोट्यावधी रुपयाची संपत्ती कोठून आनली? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
काही दिवसापुर्वी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात छापून जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना तसेच प्रशासकीय अधिकार्यांना ब्लॅकमेल केले. या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या बोठे याचाही सहभाग आहे का? याचा देखील तपास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बोठे याने मिळवलेल्या पदव्या दडपशाहीने मिळवल्या का? हा उलगडा करण्यासाठी पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी, त्याची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved