अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : नगर तालुक्यातील जखणगाव येथील ‘त्या’ दवाखान्यातुन पोलिसांनी ऑपरेशन व गर्भपात करण्याचे साहित्य, गर्भपात झालेल्या गर्भाचे तुकडे असणारी प्लास्टिकची बाटली आदी साहित्य जप्त केले होते.
आता हे गर्भाचे तुकडे तपाणीसाठी जिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या अहवालाकडे लक्ष लागले असून हा अहवाल तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, ‘हे प्रकरण संशयास्पद असून, प्रकरणामध्ये अजुन कोणी आहेत का? याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
नगर तालुक्यातील जखणगाव येथे डॉ.गंधे यांच्या रुग्णालयात एका महिलेचा गर्भपात केल्याची घटना घडली होती. गर्भपात करीत असतानाच स्थानिक गुन्हा शाखेने विभागाच्या पथकाने आरोपी डॉ. गंधे याला पकडले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गंधे याला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. महिलेचा गर्भपात केल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णालयात कोण कोण होते याचा शोध सुरु केला आहे.
याबाबत तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ.डी.आर.जारवाल यांनी सांगितले की, ‘या घटनेचा सखोल तपास सुरु केला आहे. घटनास्थळावरून जप्त केलेले गर्भाचे तुकडे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दिले आहेत.
‘हे प्रकरण संशयास्पद’ त्या महिलेची एक सोनोग्राफी पुणे तर दुसरी नगर जिल्ह्यात झालेली आहे. जिल्हा बंदी असताना ती महिला या दोन्ही जिल्ह्यात ये-जा कशी करत होती?
जर त्या गर्भाला व्यंग होते तर त्यासाठी मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात जाऊन गर्भपात का केला नाही? त्या गर्भाचे तुकडे करून गर्भाचे लिंग लपविण्याचा प्रयत्न का केला गेला? त्या दोन्ही सोनोग्राफी केंद्राची अजूनही तपासणी का झाली नाही? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
यात खरोखर गर्भलिंग निदान झाले असेल तर त्यात गर्भलिंग निदान कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.- गणेश बोऱ्हाडे, सदस्य, जिल्हास्तरीय गर्भलिंग निदान कायदा समिती
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews