जगणे झाले मुश्किल… येथील नागरिकांनी माजी आमदारांपुढे मांडली व्यथा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- आधीच जिल्ह्यात कोरोनामुळे गेले अनेक महिने अर्थव्यवस्थेचे चाक गाळात रुतलेले होते. यामुळे अनेकांचा कामधंदा बंद झाला, बेरोजगारी आली. त्यातच परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले.

यामुळे व्यवस्थित झालेल्या नागरिकांनी आपले गाऱ्हाणे थेट माजी आमदारांसमोर मांडले. कोरोना महामारीने गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना त्रस्त केले आहे.

रोजगार नाही, भातपीक नष्ट झाले. त्यातच तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळत नाही. तालुका प्रशासन लक्ष देत नसल्याने पेठेवाडी ग्रामस्थांनी 25 किलोमीटर पायपीट करीत राजूरला येऊन पिचड यांची भेट घेतली.

समस्या मांडल्या. जी अवस्था पेठेवाडीची, तीच कुमशेत, पाचनई, भोजदरी, ठाकरवाडीची. स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नसल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मुलाबाळांसह उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयात ठिय्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24