काही डॉक्टरांमध्ये एखादा रावणही असू शकतो हे आज सिद्ध झाले… वाचा काय झाले साईंच्या शिर्डीत ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून येथे श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवून श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये राज्यातून रुग्ण येत असतात ,

येथे श्री साईबाबा नंतर डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप समजले जाते, मात्र अशा काही डॉक्टरांमध्ये एखादा रावणनही असू शकतो हे नुसतेच सिद्ध झाले असून शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील डॉक्टर वैभव बबन तांबे ह्या डॉक्टराने एका अल्पवयीन मुलीवर तपासणीच्या नावाखाली विनयभंग केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे,

या संदर्भात शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे, या प्रकारामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना श्री साईबाबांनी रुग्णसेवा केली, तसेच उदी प्रसाद देऊन अनेकांचे रोग बरे केले, तोच वारसा घेऊन शिर्डीत श्री साईसंस्थानने रुग्णालय थाटले आहेत,

या रुग्णालयात साईबाबांवर श्रद्धा ठेवून शिर्डी व परिसराप्रमाणे जिल्ह्यातील व राज्यातील परराज्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात ,कारण हे श्री साईबाबांचे हॉस्पिटल आहे ,अशी सर्वांची श्रद्धा भावना आहे, येथिल हॉस्पिटलमधील डॉक्टरही ही एक देवाचे अवतार समजले जातात, मात्र एका डॉक्टरने त्यास काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे,

डॉक्टर वैभव बबन तांबे या डॉक्टराने येथे एक तरुणी उपचारासाठी आली असता तिला तपासणीच्या नावाखाली तिचा विनयभंग दिनांक 19/ 9 /2020 रोजी स, 3. 30 ते सांय 7.30 दरम्यान केला आहे व तशी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि,नं,1 627/2020 प्रमाणे भा,द,वि, कलम 354 अ,ब,आणि बालकांचे लैंगिक शोषणाचे

कलम 8/ 10 प्रमाणे गुन्हाही दाखल झाला आहे , घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे तसेच सपोनि मिथुन घुगे व सपोनि दातरे यांनीही भेट दिली आहे, या संदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत, दरम्यान या घटनेची चर्चा शिर्डी व परिसरात होताच मोठी खळबळ उडाली आहे,

शिर्डी व परिसरातून या घटनेचा मोठ्या स्वरुपात निषेध करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे याच हॉस्पिटलमध्ये इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी या घटनेचा निषेध केला आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24