अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- मराठवाड्यासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून पाणीसाठा राखून जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहे.
12 दरवाज्यातून गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरू असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. .जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर भागात पावसाची जोरदार हजेरी असून
जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. वरच्या बाजूची धरणे भरल्याने या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली असल्याने राज्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. सर्वदूर दमदार पाऊस झाल्यानंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत आहे.
पाणलोट क्षेत्र व अहमदनगर-नाशिक जिल्ह्यात रविवारी (सहा सप्टेंबर) जोरदार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved