अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साेशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका पाेस्टरमध्ये काँग्रेसचे सर्वात तरुण नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांना अस्तनीतील साप असे संबाेधले आहे.
पाेस्टरमध्ये एका बाजूला काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य व वरिष्ठ नेते प्रमाेद तिवारी, त्यानंतर राहुल गांधी, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी-वढेरा व कमलनाथ यांचे छायाचित्रे पाेस्टरवर आहेत.
या सगळ्यांच्या मध्यभागी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांचे छायाचित्र आहे. पाेस्टरच्या खालच्या बाजूला हातात कमळ घेतलेले शिंदे दाखवले असून त्यांच्या वरच्या बाजूला फणा काढलेला नाग दाखवला आहे.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे महानगर सचिव हसीव अहमद यांचे पाेस्टर आहे. अहमद यांनी साेशल मीडियावर शिंदे यांच्याविराेधात पाेस्टर व्हायरल करून त्यांना अस्तनीतील साप म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com