अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सोनार यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
आज दुपारी साडेबारा वाजता नगरमधील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध वृत्तपत्रांतून काम करताना त्यांनी जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडले. स्वत:चे वृत्तपत्रही चालविले. सर्वच क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठीही त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका कतृत्ववान पत्रकाराच्या जाण्याने जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.