के. के. रेंजमधील ‘त्या’ २३ गावांत खळबळ; ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. 

परंतु काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींनी या जमिनींचे अधिग्रहण होणार नसल्याचे सांगितले होते. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क्षेत्राचे  मूल्याकंन घेतल्यानंतर गावांमध्ये पुन्हा पाहणी सुरू झाली आहे.

त्यामुळे या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून नागरिक चिंतेमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात के.के. रेंज बाबत बैठक घेत अधिग्रहण होऊ

देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे.

दरम्यान, सैन्य दलाच्या अधिका-यांंनी केलेल्या  पाहणीमुळे २३ गावांमध्ये अधिग्रहणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. भारतीय सैन्य दलाकडून

अधिग्रहण होणार नसेल तर मालमत्तेची माहिती, मूल्याकंन तसेच पाहणी कशासाठी केली जात आहे? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24