कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड ! रडत व्हिडीओ बनवत केली राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती.

अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली.

बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते

पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर खुलेआम होणारे खून, गँगरेप, घरांची जाळपोळ यांचे व्हिडीओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. यांबाबत बोलताना कंगनाने हिंदूंचे रक्त इतके स्वस्त आहे का ?

तसेच हि कोणत्या पद्धतीची कॉन्स्पिरसी अर्थातच षडयंत्र चालू आहे अशी देखील विचारणा केली आहे. तर यांसारखे देशद्रोही देश चालवणार का असा खडा सवाल देखील उपस्थित केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे नुकतेच ट्विटर अकाऊंट नियमोल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मात्र धाकड गर्लने कोणालाही न जुमानता आपल्या प्रश्नांना वाट मोकळी केली आहे.

आता तिचा मोर्चा थेट फेसबुककडे वळला आहे. मात्र यावेळी खडे सवाल विचारताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले आहेत. बंगालमधील हिंसादायक दृश्ये पाहून तिचे मन गहिवरल्याने तिने हिंदूंचे रक्त फार स्वस्त आहे का अशी विचारणा केली आहे.

पहा व्हिडीओ – 

नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यानंतर तिचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले.

मात्र पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या हिंसाचाराचे दृश्य हे मन हेलावणारे आहे. याच संदर्भात तिने व्यक्त होतानाचा एक व्हिडीओ फेसबुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने स्वतः हे सारे दृश्य पाहून डिस्टर्ब झाल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून कंगना उघडपणे भाजपा आणि पीएम मोदींच्या समर्थनात दिसत आहे. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगना टीएमसीला लक्ष्य करत होती.

टीएमसीने एका भाजपा कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला होता. कंगनाच्या आरोपाची चर्चा होण्यापूर्वीच या अभिनेत्रीचे खाते निलंबित केले गेले आहे.

कंगनाच्या अकाऊंटवर निलंबनामुळे अभिनेत्रीचे चाहते खूप निराश झाले आहेत आणि सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत आहेत. ट्विटरने कंगनावर केलेल्या या कारवाईमुळे काही लोक खूश आहेत, तर काही लोक चिडले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24