काेराेना विषाणूचा भस्मासुर वाढत चालल्याचे रविवारी दिसून आले. चीनमध्ये विषाणूमुळे मृतांची संख्या रविवारी ८११ वर पाेहाेचली. २००२-२००३ मध्ये सार्समुळे माेठ्या संख्येने लाेक दगावले हाेते. त्यापेक्षा जास्त संसर्ग हाेत असलेल्या काेराेनाची बाधा आता ३७ हजार लाेकांना झाली आहे.
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनकडून दरराेज काेराेनाविषयीची माहिती जाहीर केली जाते. रविवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार चीनमधील ३१ प्रांतांत ३७ हजार १९८ लाेकांना बाधा झाली. २००२ मध्ये सार्समुळे ७०० लाेकांचे प्राण गेले हाेते. आता हुबेईत माेठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. हुबेईच्या वुहानमध्ये १ हजार ३७९ नवे संसर्ग झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. याच भागात शनिवारी ६३ जणांचा मृत्यू झाला. शिगानमध्ये १२३ जणांना विषाणूची बाधा झाली.
काेराेनाची बाधा झालेल्या देशांतील स्थिती : जपान-८६, सिंगापूर- ३३, थायलंड- ३२, हाँगकाँग-२६, दक्षिण काेरिया-२४, तैवान-१७, आॅस्ट्रेलिया-१५, मलेशिया-१५, जर्मनी-१४, अमेरिका- १२, व्हिएतनाम-१२, फ्रान्स-११, कॅनडा-०७, यूएई-०७, भारत-३, फिलिपाइन्स-३, ब्रिटन-०३, इटली-०३, रशिया-०३, कंबाेडिया-०१, फिनलंड-०१, नेपाळ-०१, श्रीलंका-०१, स्पेन-०१, बेल्जियम-०१, स्वीडन-०१.