कर्तव्याशी एकनिष्ठ रहिल्यानेच बबनराव ढाकणे यांनी राजकारणात महाराष्ट्र पादाक्रांत केला. धेयवादी रहिल्यास यश निशितपणे मिळते. समाज हा परीक्षा पाहत असतो, या परीक्षेत कुणी नापास ठरतो तर कुणाला गुण कमी मिळतात. समाजाची परीक्षा पाहण्याची प्रक्रिया अवरित सुरूच असते.
त्यामुळे अभ्यासही सारखा चालूच ठेवावा लागतो, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी केले. तर मागील गळीत हंगाम चांगला झाला. मात्र, हा हंगाम कसोटीचा ठरणार आहे. पुढीलवर्षी पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, बॅंकेच्या कर्जाची फेड व्यवस्थित सुरू असल्याने आगामी तीन वर्षांत कारखाना कर्ज़मुक्त होईल, असे प्रतिपादन श्री केदारेश्वर सहकारी साखर करखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील श्री केदारेश्वर सहकारी साखर करखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ विठ्ठल महाराज यांच्या हस्ते पार पडला. त्यांनतर झालेल्या कार्यक्रमात ॲड. ढाकणे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर रणजित घुगे, माधवराव काटे, प्रकाश दहिफळे, त्रिंबकराव चेमटे, बाजार समिती सभापती बन्सी आठरे, गहिनीनाथ शिरसाठ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सीताराम बोरुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनकुमार घोळवे, डॉ. प्रकाश घनवट, प्र. कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्र. प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. ढाकणे म्हणाले, मागील हंगाम चांगला झाला. मात्र, हा हंगाम कसोटीचा ठरणार आहे.
पुढीलवर्षी पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. बॅंकेच्या कर्जाची फेड व्यवस्थित सुरू असल्याने आगामी तीन वर्षांत कारखाना कर्ज़मुक्त होईल. गाळपास येणाऱ्या उसाला इतरांच्या बरोबरीने भाव देऊ, कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प पुढील वर्षी कार्यान्वित होईल.
त्यात स्थानिकांना नोकरीची संधी देऊ. या वेळी कल्याण नेमाणे, भाऊराव भोंगळे, भागवत गुरूजी, मयूर हुंडेकरी, बापूराव घोडके, विठ्ठल दसपुते, आदींसह ऊसउत्पादक शेतकरी, सभासद, संचालक मंडळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रास्तविक ऋषिकेश ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.