पतंगाच्या दोराने एकाचा गळा कापला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : शहरात पतंग उडविताना चिनी नायलॉन दोर अडकून दुचाकीवरील एका व्यक्तीचा गळा कापला गेला.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याबाबत सविस्तर माहिती अशी कि,मोरगेवस्ती परिसरात गुरुवारी लहा मुले रस्त्यावर पतंग उडवित होती. यावेळी बाळू मोरगे यांच्या गळ्यास पतंगाचा दोर गुंतला व गळा कापला गेला.

दरम्यान पतंग उडविण्यासाठी चिनी नायलॉन दोर वापरू नये असे अनेक वेळा जाहीर झाले. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र अशा प्रकारचे दोर विकणायांवर कायदेशीर कारवाही होत नाहीय.

अहमदनगर लाईव्ह 24