अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ज्येष्ठ नेते जगतप्रकाश नड्डा यांची सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे संघटनात्मक निवडणूक प्रभारी राधामाेहन सिंह यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी नड्डांचे अभिनंदन केले. कधीकाळी आम्ही एकाच स्कूटरवर बसून पक्षकार्य करायचो, अशी आठवण आठवण मोदींनी काढली. गतवर्षी जूनमध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनलेल्या नड्डांनी आता अमित शहांची जागा घेतली आहे.
भाजपाचे नेते जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपाचे सर्वोच्च पद आले आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. गेल्या आठ महिन्यांपासून नड्डा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. आता नड्डा यांच्यावर जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाची जबाबदारी आहे.
जे. पी. नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 मध्ये पटनातील बिहार येथे झाला. नड्डा यांचे वडील नारायण लाल नड्डा पटना विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आणि रांची विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते.
नड्डा यांनी सुरुवातीचे शिक्षण बिहार येथील स्नातक विश्वविद्यालयात पूर्ण केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले. 1975 सालच्या प्रकाश नारायण यांच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
हिमाचल विद्यापीठात शिक्षणादरम्यान ते विद्यार्थी संघटनेच्या राजकारणात आले. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते तीन वेळा भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातून आमदार झाले. १९९३ ते ९८, १९९८ ते २००३ आणि २००७ ते २०१२ पर्यंत ते आमदार होते.
मोदी सरकार एकमध्ये आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम करत आपला ठसा उमटवणारे नड्डा मोदी सरकरच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारतचे शिल्पकार म्हणून ओळखले जात. सध्या राज्यसभा सदस्य असलेल्या नड्डा यांनी हिमाचलप्रदेशातून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. हिमाचल प्रदेशात मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.
मंत्रिपदाची कारकीर्द – आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री (पदभार घेतला ९ नोव्हेंबर २०१४). हिमाचल प्रदेशातून राज्यसभा सदस्य (सदस्यत्व स्वीकारले ३ एप्रिल २०१२). हिमाचल प्रदेशचे पर्यावरण, वने, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (१९९८-२००३). बिलासपूरमधून हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य (२००७-२०१२).
Web Title know-information-about-bjp-president-jp-nadda