अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती अशी गणेशाची ओळख आहे. महाराष्ट्रातील घराघरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली जाते.
चला तर यावर्षीच्या श्रीगणेश चतुर्थीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. थोडं पुराणातही डोकावून पाहू… चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य असे आहे.
भाद्रपद महिना म्हटला की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो गणेशोत्सव. यावर्षी श्रीगणेश चतुर्थी : शनिवार, २२ ऑगस्ट २०२० भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२० रोजी रात्रौ ११ वाजून ०४ मिनिटे भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटे आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे.
यामुळे शनिवार, २२ ऑगस्ट २०२० रोजी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणेश चतुर्थी मान्यता मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरा केली जाते.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. या महिन्यातील चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिला अधिक महात्म्य आहे. या तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते.
यावेळी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. गणेश चुतर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved