पूरग्रस्तांना मदतीचा हात देवू या…. एक पणती आपणही पेटवू या..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राष्ट्र सेवा दल, अहमदनगर शहर तर्फे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

नगर – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमधून व शहरातून पुराने थैमान घातले आहे.अनेक लोकांच्याघरात पाणी शिरल्यामुळे खाण्याच्या वस्तु, कपडे,अंथरूण, पांघरूण वापरण्याजोगे राहिले नाहीत. राष्ट्र सेवा दलाचे मिरज,सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील कार्यकर्तेगेले काही दिवस पूरग्रस्तांना मदत करण्याच्या कामात सक्रीय आहेत.

याठिकाणी राष्ट्र सेवा दलाने छावण्या उभारून त्यांच्या राहण्याची,खाण्याची व त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची सोय केलीआहे .

     या पुरग्रस्तांना पूरग्रस्तांना मदत पोहचावी म्हणून राष्ट्र सेवा दल ,अहमदनगरच्यावतीने पूरग्रस्त बांधवांना तातडीचीमदत म्हणून अहमदनगर मधील नागरिकांना खालील वस्तू पाठविण्याचे आवाहन अहमदनगर राष्ट्र सेवा दलाच्या वतीनेकरण्यात येत आहे.

     देणगी म्हणून आपण खालील वस्तू देऊ शकता जीवनावश्यक वस्तू – मेणबत्त्या, नवीन ब्लँकेट्स,नवेटॉवेल,शॉल,बेडशीट,चप्पल,शूज,मुलांसाठी वह्या,पेन, वॉटर बोटल, कंपास बॉक्स, अन्न प्रकार साहित्य – बिस्किटे, पॅक करुनतांदुळ, गहू, डाळी,साखर, पीठ, हळद, मसाले, तेल शक्यतो पॅकेज्ड फूड औषधे – डेटॉल,मॉस्किटो रिपेलंट,सॅनिटरी नॅपकिन्स,डायपर्स,मेडिक्लोर,क्रोसीन, ग्लोव्ज, फेस मास्क,पॅरासिटेमॉल, ग्लुकोज पावडर, ओ आर एस/ इलेक्ट्रॉल, दैनंदिन स्वच्छता-टूथब्रश, पेस्ट ,साबण (अंगाचा व धुण्याचा), झाडू , फिनेल, डिटर्जंट पावडर , हार्पिक , ज्यांना रोख पैसे द्यायचे आहेत त्यांनीखालील लोकां कडे किंवा खाली दिलेल्या खात्यावर पैसे जमा करावेत.

     मदत देण्यासाठी सुप्रिया मैड– 8623710335,  बापू जोशी — 9273345206, अनघा राऊत — 9763715722, गोविंदआडम — 9423520657 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच पुढीलसंकलन कद्रांवर हि मदत स्वीकारली जाईल.

1) विझार्ड कॉम्प्यूटर्स शकुंतला अपार्टमेंट, 1 ला मजला, प्रोफेसर कॉलनी चौक,सावेडी,  अहमदनगर. फो.नं.- 9763715722,

2) सुरवि डिजिटल लॅब, जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहमदनगर.फो.नं.-9890486510,

3) न्यू टाईम्स स्टील फर्निचर,  गजराज हॉटेल शेजारी, बालिकाश्रम रोड, अहमदनगर.फो.नं.-7276499949,

4) योगा क्लासेस,  सौ. बालवे मॅडम, श्रीराम चौक, श्री मेडिकल समोर,अहमदनगर. फो.नं. -75881 70440

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24