कोपरगाव- शहरात फुग्यांच्या गॅस टाकीच्या स्फोटात 1 ठार व सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान स्फोटांच्या घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पालिका प्रशासनाने शहरातील गॅस फुगे विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
गांधी नगरातील आचारी हॉस्पिटल चौकात दुसऱ्या स्फोटात एक जणाचा जागीच मृत्यू झाला.तर इंदिरा नगर भागातील मावळ ग्रुप चौकात पहिला स्फोट झाला. त्यात सहा जण जखमी झाले आहेत.