कोतकर भाजपमधून बाहेर गेलेच नाहीत; महापौरांचा दावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सभापतिपदासाठी इच्छूक असलेले भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केला.

तसेच कोतकर यांना मनपाच्या स्थायी सभापतीपदी विराजमान झाले. मात्र महापौर वाकळे यांनी आज एक गौफयस्फोट केला आहे. महापौर म्हणाले कि, कोतकर भाजपमधून बाहेर गेले नाहीत,

तसे त्यांनी जाहीर केलेले नाही. स्थायी समितीचे सभापती झालेले मनोज कोतकर हे भाजपचेच आहेत. दरम्यान मंत्री शिवाजीराव गडाख,

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आणि राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत कोतकर यांचा सत्कार करण्यात आला.

कोतकर यांची बिनविरोध निवड व्हावी, म्हणून शिवसेनेच्या श्रेष्ठींनी मुंबईतून निरोप धाडत शिवसेनेचे योगीराज गाडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले.

एवढे सगळे होऊनही नाकावर पडलेल्या भाजपकडून अद्यापही सारवासारव केली जात आहे. महापौर वाकळे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले,

कोतकर आमचेच आहेत. महापौर वाकळे यांच्या या वक्तव्यावरून गोंधळाचे वातावरण कायम आहे. तसेच वाकळे यांचा दावा कोतकर यांच्या प्रवेशावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24