अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. कुकडीखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार कुकडीचे आवर्तन उद्या १३ मार्च रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना पाचपुते म्हणाले, ‘घोड व विसापूरचे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोडण्यात आलेले आहे. तसेच कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन आजपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वांचे भरणे झाल्याशिवाय सोडण्यात आलेले आवर्तन बंद होणार नाही.
सोडण्यात येणा-या पाण्याचा अपव्यय टाळून शेतक-यांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे व पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना सहकार्य करावे’ ‘घोड-कुकडीच्या नियोजनाअभावी मागे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे येथून पुढे आगामी काळात योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com