कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून सुरुवात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

 जामखेड:  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकडी चारीच्या अस्तरीकरणाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील किमी १ ते ५ चिलवडी शाखा कालवा, किमी ६ ते ९ चिलवडी शाखा कालवा, किमी ६ ते १५ कर्जत शाखा कालवा, किमी २१५ ते २२६ या चाऱ्यांचे काम सुरू असून आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केले.

चिलवडी शाखा कालव्याचे एकूण लाभक्षेत्र १३६९४ हे. त्यापैकी कर्जत तालुक्यातील एकूण ७२५९ हे. एवढे लाभक्षेत्र आहे व त्यातील उर्वरित ६४३५ हे. क्षेत्र हे करमाळा तालुक्यात मोडते. या चारीचे कालवा मुखाशी चारीची विसर्ग क्षमता ३१२ क्युसेक एवढी असून सध्याच्या तांत्रिक अडचणीमुळे सध्या ही चारी जास्तीत जास्त २०० क्युसेकने चालू शकते.

संकल्पित विसर्गाने चारी चालवण्यासाठी मुख्य कालव्यावर १९२/१९४ येथे काटनियमाक प्रस्तावित केले आहे आणि त्याचे काम होणे बाकी आहे. हे काम सन २०२० पर्यंत पूर्ण होणार असून संकल्पित विसर्ग सोडणे शक्य होईल.

चिलवडी शाखा कालव्याचे १३६९४ हे क्षेत्राकरिता पाच वितरिका आहेत. तसेच शाखा कालव्यावर डाव्या व उजव्या बाजूच्या मिळून २९ लघू वितरीका तसेच ४६ विमाचके आहेत.मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पाणी वितरण करणे जिकिरीचे ठरते.

सध्या अस्तरीकरणाच्या कामासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. चिलवडी कर्जत शाखा १ ते १५ मुख्य कालवा व २०५ ते २२६ मार्च २०२० नंतर १४१ ते १७२ अस्तरीकरण सुरू होणार आहे. चिलवडी शाखा कालव्याचे ४१ किमीपैकी २७ किमीपर्यंत वज्रचुर्ण अस्तरीकरण प्रस्तावित केले असून त्यापैकी १ ते ९ व किमी २२ मधील यांत्रिकी अस्तरीकरणाचे अपूर्ण काम सुरू करण्यात आले आहे.

किमी १ ते ५ मधील अस्तरीकरण पूर्वीचे काटछेद तयार करण्याचे काम सुरू आहे आणि गुणनियंत्रण विभागाच्या सूचनेनुसार अस्तरीकरणाचे काम सुरू होणार आहे. सध्या किमी ६ ते ८ हे काम पूर्ण झाले आहे, तर किमी ९ व २२ चे काम प्रगतिपथावर आहे.

मार्चअखेर चिलवडीवरील सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२० अखेर १० कोटी निधीची आवशकता आहे. निधीअभावी ही कामे प्रलंबित होती.

मात्र, पवार यांच्या पाठपुराव्याने वर्षांची प्रतीक्षा सत्यात उतरताना दिसत आहे. जामखेड तालुक्यातील बेनवडी (दत्तनगर) येथे चिलवडी शाखा कालवा १ ते ५ किमी व कर्जत शाखा कालवा १ ते ५ किमीमधील अस्तरीकरण कामाचे आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24