सराफावर गोळीबार करत लाखो रुपयांच्या सोन्याचांदीचा ऐवज लुटला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर शहरातील घुलेवाडी शिवारातील साईकृपा ज्वेलर्सच्या मालकावर दरोडेखोरांनी हल्ला केला. मुद्देमाल लुबाडून धूम ठोकत असताना हल्लेखोरांनी गोळीबार केला.

या गोळीबारात रस्त्याने जाणार्‍या मोेटारसायकलवरील तरुणाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर नाशिकच्या दिशेने पसार झाले.

ही घटना घुलेवाडी शिवारातील आदर्शनगर येथे काल सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली. सदर तरुणाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. सदर सराफावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

अविनाश सुभाष शर्मा (रा. केशवनगर, घुलेवाडी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घुलेवाडी फाटा येथे साईकृपा ज्वेलर्स या नावाने ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी यांचे दुकान आहे.

काल सायंकाळी नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर चिंतामणी हे दुकान आवरुन दुकानातील मुद्देमाल सोबत घेवून आपल्या वेगनार कार क्रमांक एमएच 12 ईएम 0107 मधून घराकडे जाण्यासाठी निघाले.

आदर्शनगर येथे असलेल्या त्यांच्या घराजवळ आले. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या कारमध्ये चौघेजण होते. कारमधून तिघेजण उतरले. लाकडी दांड्याच्या सहाय्याने तिघांनी मारुती वेगनार कारवर हल्ला केला.

ज्ञानेश्वर चिंतामणी यांनी आरडाओरड केला. तोपर्यंत हल्लेखोरांनी गाडीच्या सर्व काचा फोडल्या. कारमधील बॅग घेवून हल्लेखोर पसार होण्याच्या मार्गावर असतांना त्याचवेळी आवाजामुळे तेथून मोटारसायकलवरुन जात असलेले अविनाश शर्मा व वाळूंज हे दोघेजण थांबले.

त्याचवेळी हल्लेखोरांच्या पांढर्‍या कारमध्ये बसलेल्या एका हल्लेखोराने शर्मा यांच्यावर गोळीबार केला. शर्मा यांच्या डाव्या मांडीतून गोळी पोटात गेली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्याने चिंतामणी, शर्मा यांनी आरडाओरड केला. हल्लेखोर चारचाकी वाहनातून नाशिकच्या दिशेने पसार झाले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24