अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- घराचा कडी कोयंडा तोडून घरातील सदस्याच्या गळ्याला कोयता लावून घरातील ७९ हजारांचे सोन्याचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे घडली.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील अमोल सुखदेव शेळके यांच्या घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाने तरी उचकाटून घरात प्रवेश केला.
त्यानंतर त्या चोरट्याने अमोल शेळके यांच्या गळ्याला कोयता लावला व गपचूप बस जर आरडाओरडा केला तर कोयत्यनेच गळा कापून टाकील अशी धमकी दिली.
यावेळी चोरट्याने घरातील साहित्याची उचका पाचक करून ७९ हजार ५०० रूपयाचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले.याबाबत अमोल सुखदेव शेळकेयांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सपोनि वाघ हे करत आहेत.