अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोना महामारी ही गरिबांना उद््ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे राज्य, देश व जगावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे.
मात्र याचा गैरफायदा घेऊन उपचारानंतर मृत्यू पावलेल्या कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णाच्या शरीरातील अवयवाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे.
यातून कोट्यवधींचा गोरखधंदा केला जात आहे, असा गौप्यस्फोट पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
प्रा. कवाडे हे रविवारी अकोल्यातील श्रीमंत लाॅनवर आयोजित एका विवाह सोहळ्यास उपस्थित होते. या दरम्यान कार्यकर्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. कवाडे यांनीही बाब उघड करतानाच
कोरोनावरील उपचारानंतर आरोग्य विभागाकडून सुुुुरू असलेल्या गैरप्रकारावर प्रकाश टाकत मानवी अवयव तस्करीबाबतचा गौप्यस्फोट केला.
यावेळी त्यांच्यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जयदीप कवाडे, गणेश सोनवणे, शशिकांत सोनवणे, प्रा. जयंत गायकवाड, सुनील गायकवाड उपस्थित होते.
ते म्हणाले, कोरोना मृत रूग्णांच्या बाबत गंभीर प्रकार कानी पडत आहेत. बऱ्याच प्रमाणात कोरोना पॅाझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहावर नातेवाईकांना बाजूला ठेवून रूग्णालय प्रशासनाकडून अंतिम संस्कार होत आहेत.
अशा कोरोना बाधित मृतदेहाच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. तसेच कोरोना बाधित पॅाझिटिव्ह रुग्णावर उपचार करण्याच्या पार्श्वभूमीवर खाजगी रूग्णालयातून रूग्ण व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
तेथे मानवी अवयव घोटाळे व आर्थिक भ्रष्टाचार होत आहेत. यामुळे कोरोनावर उपचार घेण्याबाबत जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com